पत्नीसोबत कडाक्याचं भांडण, पतीराजाचा छतावरुन उडी मारण्याचा प्रयत्न
एबीपी माझा वेब टीम | 07 Jun 2017 11:27 PM (IST)
वसई : पत्नीसोबत कडाक्याचं भांडण झाल्याने पतीनं थेट छतावरुन उडी मारण्याचा प्रयत्न केला. वसईतल्या भास्कर आळीत आज सकाळी साडे सात वाजता ही घटना घडली भास्कर आळीत राहणाऱ्या संदीप परशुराम चव्हाणचं काल रात्री पत्नीसोबत कडाक्याचं भांडण झालं होतं. या भांडणाला कंटाळून संदीप सकाळी शेजारच्या रिकाम्या बंगल्याच्या छतावर चढला आणि तिथून जीव देण्याची धमकी देऊ लागला. संदीपची ही विरुगिरी पाहून परिसरातील लोक गोळा झाले. त्यांनी अग्निशमन दलाला बोलावलं. आणि संदीपला सुखरुप खाली उतरवण्यात आलं. त्यानंतर दिवसभर वसईत या विरुगिरी पतीची कहाणी चौकाचौकात रंगली होती.