ठाणे: ठाणे रेल्वे स्थानकाजवळ सायडिंगला उभ्या असलेल्या लोकलच्या डब्ब्याला आज संध्याकाळच्या सुमारास अचानक आग लागली. त्याचवेळी जोरदार पाऊस सुरु असल्यानं सुदैवानं आग इतर डब्यात पसरली नाही.


अग्निशमन दलाच्या मदतीनं तसंच सीजफायरच्या मदतीनं ही आग तात्काळ विझवण्यात आली. लोकल सायडिंगला असल्यानं रेल्वे वाहतुकीवर त्याचा कोणताही परिणाम झालेला नाही.

दरम्यान, ही आग कशामुळे लागली याबाबतचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. रेल्वे प्रशासनाकडून याचा सध्या शोध सुरु आहे.