बोईसरमध्ये पतीच्या आदेशाने नातेवाईकाचा नववधूवर बलात्कार
एबीपी माझा वेब टीम | 12 Jul 2016 05:49 PM (IST)
पालघर : लग्नाच्या दुसऱ्याच दिवशीच पतीच्या डोळ्यादेखत नातेवाईकानं नवविवाहितेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलीय. पती पत्नीच्या नात्याला काळीमा फासणारी ही घटना पालघर जिल्ह्यातील बोईसरमध्ये घडलीय. बोईसर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पती आणि त्याच्या नातेवाईकाला अटक करण्यात आलीय. या प्रकरणातील पीडितेचं दोन दिवसांपूर्वीच लग्न झालं होतं. पतीच्या नातेवाईकानं नववधूवर बलात्कार केला. धक्कादायक बाब म्हणजे पत्नीनं जेव्हा पतीकडे तक्रार केली, तेव्हा पतीनं स्वतःच्या डोळ्यादेखत पुन्हा एकदा नातेवाईकाला बलात्कार करायला सांगितला. या संपूर्ण घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून, न्यायालयानं दोन्ही आरोपींना 16 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावलीय.