मुंबई : मुंबईतील मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. कसाऱ्याला जाणाऱ्या लोकलच्या पेंटाग्राफला आग लागल्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. लोकल 15 ते 20 मिनिटं उशिराने धावत आहेत.
मध्य रेल्वेच्या कोपर स्टेशनवर असलेल्या लोकलच्या पेंटाग्राफला आग लागली. रात्री 8.15 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.
दरम्यान कसाऱ्याकडे जाणारी फास्ट ट्रॅकवरील वाहतूक स्लो ट्रॅकवर वळवण्यात आली आहे. बदलापूर-कर्जतहून मुंबईकडे येणाऱ्या काही गाड्याही उशिराने धावत आहेत, तर काही कर्जत गाड्या कल्याण स्टेशनपर्यंतच चालवल्या जात आहेत.