मुंबई : एमटीएनएलच्या वांद्रे येथील इमारतीत भीषण आग लागली आहे. आग लागलेल्या इमारतीच्या गच्चीवर जवळपास 100 लोक अडकले असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे काम सुरु आहे.


आग मोठी असल्याने अग्निशमन दलाकडून 14 फायर इंजिन पाठवण्यात आले आहेत. अग्निशमन दलात नव्याने दाखल झालेल्या रोबोच्या सहाय्याने आग विझवण्याचे काम सुरु आहे.

आग लागलेली इमारत नऊ मजल्यांची आहे. त्यामधल्या तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यावर आग लागली आहे. या आगीमुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. तसेच मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीदेखील झाली आहे.

लाईव्ह पाहा