HSC Exam 2023 Maths Paper Leak : बारावीच्या (HSC Board) गणिताच्या पेपरफुटी (Maths Paper Leak) प्रकरणाचा संबंध मुंबईतील विद्यार्थ्यांशीही असल्याचं समोर आलं आहे. मुंबईतील विद्यार्थ्याच्या मोबाईलमध्ये गणित पेपरचा काही भाग आढळला आहे. डॉ. अँथोनी डिसिल्वा हायस्कूलमधील विज्ञान शाखेतील (Science Stream) परीक्षार्थीच्या मोबाईलमध्ये दहा वाजून 17 मिनिटांनी गणिताचा पेपर सापडला. या प्रकरणी तीन विद्यार्थ्यांसह अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास क्राईम ब्रांचकडे वर्ग करण्यात आला आहे. 


बारावीच्या गणिताच्या पेपरफुटीची मुंबई कनेक्शन


बारावीच्या गणिताचा पेपरफुटी प्रकरणाचं मुंबई कनेक्शन समोर आलं आहे. बारावीच्या गणिताच्या पेपरफुटी प्रकरणाचा संबंध मुंबईतील विद्यार्थ्यांशीही असल्याचं उघड झालं आहे. मुंबईतील विद्यार्थ्याच्या मोबाईलमध्ये गणित पेपरचा काही भाग आढळला आहे. या प्रकरणी तीन विद्यार्थ्यांसह अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास क्राईम ब्रांचकडे वर्ग करण्यात आला आहे. बुलढाण्यातील कथित पेपरफुटी प्रकरणी पेपर फुटला नसल्याचा बोर्डाने  केला होता. 


बुलढाण्यात फुटला गणिताचा पेपर


बारावी बोर्डाचा आज गणित विषयाच्या प्रश्नपत्रिकेतील दोन पानं सिंदखेड राजा तालुक्यातील एका परीक्षा केंद्रावरून व्हायरल झाली होती. याबाबतची बातमी आज सर्व वृत्तवाहिन्यावरून प्रसिध्द झाली. दरम्या, या विषयाची प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यापर्यंत पोहोचल्याचे राज्यात कोठेही आढळून आलेलं नव्हतं नाही. यामुळे इयत्ता 12 वी च्या गणित विषयाची परीक्षा पुन्हा घेतली जाणार नसल्याचे राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी स्पष्ट केलं होतं. मात्र मुंबईतील विद्यार्थ्याच्या मोबाईलमध्ये गणिताच्या पेपरची काही पानं आढळल्याने या प्रकरणाला वेगळं वळण लागलं आहे.


मुंबईतील विद्यार्थ्याच्या मोबाईलमध्ये पेपर


बुलढाण्यातील कथित पेपरफुटी प्रकरणी पेपर फुटला नसल्याचा बोर्डाने दावा केला होता. मात्र पेपर फुटला नसल्याच्या बोर्डाच्या दाव्यावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. मुंबईतील विद्यार्थ्याच्या मोबाईलमध्ये गणिताच्या पेपरचा काही भाग आढळल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. परीक्षा केंद्रात या विद्यार्थ्याकडून जप्त करण्यात आला होता. मोबाईल तपासल्यावर त्यामध्ये गणिताचा पेपर आढळला आहे. विद्यार्थ्याला 10 वाजून 17 मिनिटांनी त्याला प्रश्नपत्रिकेचा काही भाग मिळाल्याचं तपासात उघड झालं आहे.


तीन विद्यार्थ्यांसह अज्ञात व्यक्तिविरोधात गुन्हा


दरम्यान, या प्रकरणी शिवाजी पार्क पोलिसांनी तीन परीक्षार्थींसह एका अज्ञाताविरोधात केला गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेता याचा तपास गुन्हे शाखेकडे देण्यात आला आहे. बुलढाण्यात परीक्षा सुरू झाल्यानंतर अर्ध्या तासातच फुटल्याचं समोर आलं होतं. गणिताचा पेपर सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली होती. दरम्यान, बुलढाण्यात गणिताचा पेपर फुटला नाही, असं बोर्डाकडून स्पष्टीकरण देण्यात आलं होतं. मात्र आता याप्रकरणी तपासाला नवं वळ लागलं असून बोर्डावर प्रश्न उपस्थित होत आहेत.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


HSC Paper Leak: बुलढाण्यात बारावीचा गणिताचा पेपर फुटल्याची चर्चा, परीक्षा सुरु झाल्यानंतर अर्ध्या तासात पेपर सोशल मीडियावर व्हायरल


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI