HSC Maths Paper Leak : बुलढाणाजिल्ह्याच्या सिंदखेडराजामध्ये (Buldhana Sindkhed News)  बारावीचा गणिताचा पेपर परीक्षा (HSC Maths Paper Leak)  सुरु झाल्यानंतर अर्ध्या तासातच फुटल्याची चर्चा आहे. गणिताचा पेपर सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. बोर्डाकडून मात्र पेपरफुटीला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. पूर्ण माहिती घेतल्यानंतरच बोर्ड अधिकृतरित्या माहिती देणार आहे. पेपरफुटीच्या मुद्द्यावर विधानसभेतही चर्चा झाली. विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडून सभागृहात मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. 


पेपरफुटीबाबत अजित पवारांचा सवाल, विखे पाटील यांचं उत्तर


दरम्यान अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडून सभागृहात पेपरफुटीचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. अजित पवार म्हणाले की, "सिंदखेडचा राजा या ठिकाणी बारावीचा पेपर फुटला आहे. अभ्यास करणाऱ्यां विद्यार्थ्यांचं मोठ नुकसान झाले आहे."सरकार काय करणार असा सवाल अजति पवारांनी उपस्थित केला. अजित पवारांनी हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर  या प्रकरणी संध्याकाळपर्यंत चौकशी करु अशी प्रतिक्रिया राधाकृष्ण विखे पाटलांनी दिलीय आहे. 


शिक्षण मंडळाकडून कॉपीमुक्त अभियान, मात्र...


बोर्डाच्या खबरदारीनंतरही पहिल्याच दिवसापासून परीक्षेपूर्वी पेपर व्हायरल होण्याचे प्रकरण समोर येत आहेत. एकीकडे शिक्षण मंडळ कॉपीमुक्त परीक्षा व्हाव्यात यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना करत आहे. बैठे पथक, भरारी पथक यासह पोलिसांची पथके परीक्षा केंद्राबाहेर तैनात करण्यात आली आहेत. तर दुसरीकडे मात्र थेट परीक्षा केंद्रावरील पेपर फुटल्याची प्रकरणे समोर येत आहे.  त्यामुळे या प्रकारामुळे शिक्षण विभागाच्या कारभारावरच प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.


परभणीत शिक्षकांनी फोडला होता पेपर 


परभणी जिल्ह्याच्या सोनपेठमध्ये चक्क परीक्षा केंद्र असलेल्या महालिंगेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या शिक्षकांनीच इंग्रजीचा पेपर फोडून विद्यार्थ्यांसाठी कॉपी तयार करत असल्याचा धक्कादायक प्रकार सोनपेठ पोलिसांनी उघडकीस आणला. या प्रकरणी उपकेंद्र संचालक कालिदास कुलकर्णी, इंग्रजी शिक्षक बालाजी बुलबुले, जिजामाता विद्यालयाचा शिक्षक गणेश जयतपाल, शिक्षकरमेश मारोती शिंदे, शिक्षक सिद्धार्थ सोनाळे, शिक्षक भास्कर तिरमले या जणांवर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली.


इतर महत्त्वाच्या बातम्या :


SSC Exam: उद्या परीक्षा अन् आज केंद्र बदललं, कारणही सांगितलं नाही; वाशीतील भोंगळ कारभारामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रम


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI