होळीमध्ये पोलिसांवर हल्ले करणाऱ्या नराधमाच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यासाठी मुंबईत 25 फुटांचा हा पुतळा करण्यात आला होता. पोलिसांवरील हल्ल्यात मृत्युमूखी पडलेल्या पोलीस कॉन्स्टेबल विलास शिंदे यांच्या कुटूंबियाच्या हस्ते होळी पेटवण्यात आली.
तर दुसरीकडं नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर ईव्हीएम मशिनमध्ये घोळ झाल्याचा आरोप झाला. त्यामुळे दादरमध्ये मनसेकडून ईव्हीएम मशिनच्या प्रतिकात्मक ईव्हीएम मशिनचं दहन करत होळी साजरी केली.
कोकणातही होळीचा मोठा उत्साह दिसून आला. रायगडमध्ये कोळी बांधवांनी होळीनिमित्त आपल्या होड्या सजवल्या. होळीच्या दिवशी मच्छीमार बांधव हे आपल्या मासेमारी बोटीची पूजा करून त्यांच्या सुखी आयुष्याची प्रार्थना करतात. यासाठी, ते त्यांच्या बोटी देखील विविध रंगांच्या पताका लावून सजवित असतात.