मुंबई : राज्यासह देशभरात होळीचा सण उत्साहात साजरा केला जात आहे. पण मुंबईतल्या वरळीच्या कोळीवाड्यात होळी सणाचं महत्व काही औरच आहे. कारण इथे पारंपरिक पद्धतीने होळी साजरी करण्यात येते. कोळीवाड्यामध्ये होळीच्या दोन दिवस आधीपासून होळी साजरी केली जाते.
काल (बुधवार) मध्यरात्रीपासून कोळीबांधवांनी ‘कोंबार हावली’ साजरी केली. यात कोळी महिलांनी पारंपरिक कोळी पोषाख घालून डोक्यावर मातीची घागर घेऊन कोळी गीतावर फेर धरला. पारंपरिक गाण्यांच्या तालावर सगळे कोळीबांधव एकत्र आले आणि त्यांनी होळी सणाची सुरुवात केली.
पौर्णिमेच्या आदल्या दिवशी ‘कोंबार हावली’ आणि आज ‘गोताची हावली’ असं दोन दिवस ही होळी साजरी होणार आहे.
राज्यभरात होळीचा उत्साह, मुंबईतल्या कोळीवाड्यात होळीला सुरवात
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Mar 2018 08:28 AM (IST)
राज्यासह देशभरात होळीचा सण उत्साहात साजरा केला जात आहे. पण मुंबईतल्या वरळीच्या कोळीवाड्यात होळी सणाचं महत्व काही औरच आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -