मुंबई : मुंबईत भरधाव कारच्या धडकेत जखमी होऊन मृत्यूशी झुंज देणाऱ्या डॉ. दीपाली लहामटेचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला. 24 मार्च रोजी आपल्या भावाला डॉक्टर झाल्याबद्दल अभिनंदन करण्यासाठी चाललेल्या दीपालीला मरीन ड्राईव्हवरच्या सिग्नलवर शिखा जव्हेरी या तरुणीने भरधाव गाडीने धडक दिली. पण सुमारे 4 दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर दीपालीची प्राणज्योत मालवली.
येत्या काही महिन्यातच दीपाली डॉक्टर होणार होती. पण या अपघातानं लहामटे कुटुंब पूर्णपणे उद्धवस्त झालं आहे. दीपालीच्या भावाने तिचे अवयव दान करणार असल्याचंही सांगितलं.
दीपाली लहामटे ही नायर रुग्णालयाच्या दंतमहाविद्यालयात इंटर्न म्हणून काम करत होती. दीपालीच्या एमबीबीएसचं शिक्षण पूर्ण केलेल्या भावाचं जे.जे. जिमखान्यात कॉन्व्होकेशन होतं. त्यासाठी गेल्या शनिवारी, म्हणजे 24 मार्चला ती पायी चालली होती.
तारापोरवाला मत्स्यालयाजवळ असलेल्या सिग्नलला झेब्रा क्रॉसिंगवर दीपाली रस्ता ओलांडत होती. त्यावेळी लाल सिग्नल असतानाही एका पांढऱ्या होंडा सिटी कारने सिग्नल तोडला आणि दीपालीला जोरदार धडक दिली.
एफआयआरमध्ये असलेल्या माहितीनुसार शीखा झवेरी नामक महिला संबंधित कार चालवत होती. नेपियन्सी भागात राहणारी शीखा शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. अपघाताच्या वेळी तिच्यासोबत गाडीत तिची धाकटी मुलगीही होती. दुर्दैवाने त्या भागातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत.
अपघातानंतर जखमी दीपालीला वैद्यकीय मदत करण्याऐवजी शीखाने पळ काढला. एका व्यक्तीने पाठलाग करुन तिला पुढच्या सिग्नलवर गाठलं.
काही पादचाऱ्यांनी दीपालीला भाटिया रुग्णालयात दाखल केलं. गेल्या शनिवारपासून दीपाली लाईफ सपोर्ट सिस्टमवर होती. अखेर आज तिची प्राणज्योत मालवली. दरम्यान आरोपी महिलाचालक जामिनावर बाहेर आहे.
या घटनेचे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असतील किंवा कोणालाही या घटनेबद्दल माहिती असेल, तर त्यांनी संपर्क साधावा असं आवाहन 'नायर हॉस्पिटल डेंटल कॉलेज स्टुडंट असोसिएशन'ने फेसबुक पोस्टच्या माध्यमातून केलं होतं. #JusticeForDeepali आणि #ThinkAndDrive अशा हॅशटॅगसह ही पोस्ट शेअर केली.
हिट अँड रन : कारच्या धडकेत जखमी डॉ. दीपालीची मृत्यूशी झुंज अपयशी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
30 Mar 2018 05:45 PM (IST)
मुंबईत भरधाव कारच्या धडकेत जखमी होऊन मृत्यूशी झुंज देणाऱ्या डॉ. दीपाली लहामटेचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला. 24 मार्च रोजी आपल्या भावाला डॉक्टर झाल्याबद्दल अभिनंदन करण्यासाठी चाललेल्या दीपालीला मरीन ड्राईव्हवरच्या सिग्नलवर शिखा जव्हेरी या तरुणीने भरधाव गाडीने धडक दिली. पण सुमारे 4 दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर दीपालीची प्राणज्योत मालवली.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -