Konkan Railway Update : काल कोकण रेल्वेवरील दिवा ते रत्नागिरी धावणाऱ्या पॅसेंजर ट्रेनला इतिहासात पहिल्यांदाच इलेक्ट्रिक इंजिन जोडून चालवण्यात आले. कालपर्यंत कोकण रेल्वे मार्गावर केवळ डिझेलवर चालणारे इंजिन जोडून एक्सप्रेस चालवल्या जात होत्या. त्यामुळे प्रदूषणात वाढ व्हायची तसेच तांत्रिक अडचणी आणि मर्यादा यायच्या. मात्र गेल्या काही वर्षात कोकण रेल्वे मार्गावर जे विद्युतीकरण करण्यात येत आहे, त्याचाच परिणाम म्हणून आता इलेक्ट्रिक इंजिनवर एक्सप्रेस चालवण्यात येत आहेत. 

 

काल दिवा रत्नागिरी पॅसेंजर wcam3 हे इलेक्ट्रिक इंजिन जोडून चालवली गेली. या एक्सप्रेसला कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी जागोजागी रेलफॅन्स उभे होते. अशाच आदित्य कांबळी या रेल फॅनने या पॅसेंजरचा व्हिडीओ शूट केला आहे. इतका मोठा आणि ऐतिहासिक दिवस असूनही कोकण रेल्वे किंवा मध्य रेल्वेकडून कोणत्याही प्रकारे सेलिब्रेशन करण्यात आले नाही किंवा इलेक्ट्रिक इंजिनाचे सुशोभिकरण करण्यात आले नव्हते.

 

त्यामुळे अनेक रेलफॅन्स नाराज झालेले दिसून आले. मात्र काल चालवलेल्या या पहिल्या इलेक्ट्रिक इंजिन पॅसेंजर एक्सप्रेसमुळे, येणाऱ्या काळात कोकण रेल्वेवर इलेक्ट्रिक इंजिनाचे पर्व सुरू होईल. त्यामुळे हिरव्यागार निसर्गातून धावणाऱ्या कोकण रेल्वेमुळे शून्य प्रदूषण होणार आहे.

 



इतर बातम्या : 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha