मुंबई: मुंबईतील नामांकित हिरानंदानी रुग्णालयातून किडनी रॅकेट प्रकरणी 5 डॉक्टरांना अटक केली आहे. हिरानंदानी रुग्णालयात किडनी रॅकेट सुरु असल्याची माहिती मिळाल्यानंतर मुंबई पोलिसांना ही कारवाई केली आहे. अटक केलेल्या 5 डॉक्टरांपैकी एक जण रुग्णालयाचा सीईओ आहे तर एक जण वैद्यकीय संचालक असल्याची माहिती समजते आहे.

 

मुंबईमधील किडनी रॅकेट प्रकरणी करण्यात आलेली ही सर्वात मोठी कारवाई आहे. किती वर्षापासून हे रॅकेट सुरु होतं याची सध्या पोलीस चौकशी करत आहेत.

 

याप्रकरणी पुरावा मिळाल्यानंतर मुंबई पोलिसांनी तात्काळ कारवाई करुन पाचही डॉक्टरांना बेड्या ठोकल्या आहेत. उद्या या पाचही जणांना कोर्टात हजर करण्यात येणार आहे. दरम्यान, आतापर्यंत त्यांनी किती जणांचं अवैधरित्या किडनी प्रत्यारोपण केलं आहे याचीही चौकशी करण्यात येणार आहे.