कोर्टाचा अवमान करणाऱ्या माहीम पोलिसांवर कारवाई का नाही : हायकोर्ट
अमेय राणे, एबीपी माझा, मुंबई | 03 May 2017 04:43 PM (IST)
मुंबई : ध्वनी प्रदुषणाच्या बाबतीत राज्य सरकार बिलकुल गंभीर नाही, अशा शब्दात मुंबई हायकोर्टानं राज्य सरकारला फटकारलं आहे. कोर्टाच्या आदेशाचा अवमान केल्याबद्दल माहीम पोलिसांवर राज्य सरकारकडून कोणतीही कारवाई न झाल्यामुळे हायकोर्टानं राज्य सरकारच्या भूमिकेवर ताशेरे ओढले आहेत. कायदा मोडणाऱ्या माहीम पोलिस स्टेशनच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला केवळ सक्त ताकीद आणि एसीपीच्या भुमिकेवर पोलिस आयुक्तांकडून केवळ नाराजी व्यक्त करण्यात आल्यानं हायकोर्टानं आपली नाराजी व्यक्त केली. राज्य सरकारकडून पोलिसांवर कठोर कारवाईची अपेक्षा होती, मात्र ती घेण्यात न आल्यानं हायकोर्टानं राज्य सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. नुकतंच ऊरुसादरम्यान माहीम पोलिस स्टेशनमध्ये लाऊड स्पीकर लावल्याप्रकरणी हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. 9 जूनला हायकोर्टात माहीम पोलिसांनी केलेल्या अवमान प्रकरणी पुढील सुनावणी होणार आहे.