स्वयंघोषित धर्मगुरु राधे माँला हायकोर्टाचा दिलासा
एबीपी माझा वेब टीम | 28 Sep 2016 11:27 PM (IST)
मुंबई: स्वयंघोषित धर्मगुरु राधे माँला हायकोर्टानं दिलासा दिला आहे. राधे माँ विरोधात गुन्हा नोंदवण्याची मागणी करणारी याचिका कोर्टानं निकाली काढली आहे. पुत्र प्राप्ती आणि पैसा मिळवण्यासाठी राधे माँ लोकांची दिशाभूल करते, पोलिसात तक्रार करुनही गुन्हा नोंदवण्यात आला नसल्यानं कोर्टानं गुन्हा नोंदवण्याचे आदेश द्यावे, अशी मागणी याचिकेत करण्यात आली होती. कोर्टानं ही जनहित याचिका होऊ शकत नसल्याचं सांगत ही याचिका निकाली काढली. तसंच पोलीस गुन्हा दाखल करत नसतील तर याचिकाकर्त्यांनी इतर पर्यायांचा वापर करावा, असंही हायकोर्टानं याचिकाकर्त्यांना फटकारलं आहे.