मुंबई : मुंबईत सायन स्थानकावर एका महिला टीसीने युवतीला मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मारहाणीत युवती बेशुद्ध झाल्याची माहिती आहे.
सायन स्थानकात महिला टीसीचा एका युवतीसोबत वाद झाला. दंड भरुनही तिला बसवून ठेवल्याचा आरोप आहे. या वादाचं पर्यवसन हाणामारीत झालं. टीसीच्या मारहाणीत संबंधित युवती बेशुद्ध पडल्याचं म्हटलं जातं. यानंतर चिडलेल्या प्रवाशांनी महिला टीसीलाही मारहाण केली आहे.
या सर्व मारहाणीच्या प्रकारानंतर रेल्वे पोलिसांनी मारहाण करणाऱ्या महिला टीसीला ताब्यात घेतलं आहे. पुढील चौकशी सुरु असून त्यानंतर संबंधितांवर कारवाई करण्यात येईल.