मुंबई : भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरणी अटकेत असलेल्या तीन आरोपींना जामीन देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला. अक्षय अल्हात, चेतन अल्हात आणि तुषार जंजाळ या तिघांचा जामीन अर्ज पुणे सत्र न्यायालयाने फेटाळल्यानंतर या तिघांनी जामिनासाठी हायकोर्टात याचिका दाखल केली होती.
तुषार जंजाळ या 19 वर्षीय तरुणाने पोलीस कस्टडीमुळे आपली दहावीची परीक्षा हुकल्याचं कोर्टाला सांगितलं. या याचिकेवर न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली तेव्हा हे प्रकरण सुट्टीकालीन न्यायालयात ऐकलं जाऊ शकत नाही, असे निर्देश देत याचिकाकर्त्यांना जामीन देण्यास नकार दिला.
भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरणी पुणे पोलिसांनी एकूण 14 जणांना अटक केली आहे. आपल्याविरोधात पोलिसांकडे कोणतेही पुरावे नाहीत. कुणीही जबानीत त्यांचं नाव घेतलेलं नाही. केवळ एका विशिष्ट समाजाचे असल्याने पोलीस आपल्याला यात गोवत असल्याचा हायकोर्टात आलेल्या या तीन आरोपींचा आरोप आहे.
या प्रकरणातील मुख्य आरोपी मिलिंद एकबोटे यांना पुणे सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
भीमा-कोरेगाव हिंसाचार : तिघांना जामीन देण्यास हायकोर्टाचा नकार
अमेय राणे, एबीपी माझा, मुंबई
Updated at:
10 May 2018 10:02 PM (IST)
अक्षय अल्हात, चेतन अल्हात आणि तुषार जंजाळ या तिघांचा जामीन अर्ज पुणे सत्र न्यायालयाने फेटाळल्यानंतर या तिघांनी जामिनासाठी हायकोर्टात याचिका दाखल केली होती.
प्रातिनिधिक फोटो
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -