मुंबई : भाजपप्रमाणेच शिवसेनेमध्येही घराणेशाही पाहायला मिळत आहे. मुंबई महानगरपालिकेत महिलांसाठी आरक्षित असलेल्या बऱ्याच वॉर्डमध्ये तिथल्या प्रमुख नेत्यांच्या पत्नींनाच उमेदवारी देण्यात आली आहे. तर काही ठिकाणी विद्यमान नेत्यांच्या मुलांनाही उमेदवारी देण्यात आली आहे.
शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून घराणेशाहीला विरोध होत असताना 'मातोश्री' मात्र घराणेशाहीसाठी मेहेरबान असल्याचं दिसतं आहे. परिणामी शिवसेनेत बंडखोरी पाहायला मिळत आहे.
मुंबई महापालिकेसाठी शिवसेनेची पहिली यादी जाहीर
शिवसेनेतील घराणेशाही
वॉर्ड क्रमांक 1 : नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची पत्नी तेजस्विनी घोसाळकर
वॉर्ड क्रमांक 4 : नगरसेवक उदेश पाटेकर यांची पत्नी सुजाता पाटेकर
वॉर्ड क्रमांक 6 : विभागप्रमुख प्रकाश कारकर यांचा पुत्र हर्षल कारकर
वॉर्ड क्रमांक 11 : माजी नगरसेवक भास्कर खुरसुंगे यांची पत्नी रिद्धी खुरसुंगे
वॉर्ड क्रमांक 144 : खासदार राहुल शेवाळे यांची पत्नी कामिनी शेवाळे
वॉर्ड क्रमांक 194 : विभागप्रमुख सदा सरवणकर यांचा पुत्र समाधान सरवणकर
वॉर्ड क्रमांक 216 : माजी विभागप्रमुख आणि नगरसेवक अरविंद दुधवडकर यांची पत्नी अरुंधती दुधवडकर