डोंबिवली : डोंबिवलीत आजपासून 90व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात होत आहे. तीन दिवस हे साहित्य संमेलन चालणार आहे.


संत सावळाराम म्हात्रे क्रीडा नगरीत पु.भा.भावे साहित्य नगरी उभारण्यात आली आहे. सकाळी 10 वाजता ध्वजारोहण होणार असून तर दुपारी चार वाजता साहित्य संमेलनाचं उद्घाटन करण्यात येणार आहे.

मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष अक्षयकुमार काळे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शरद पवार, कवी विष्णु खरे आणि अनेक नेते या उद्घाटनप्रसंगी उपस्थित असणार आहेत.

सुमारे 1 लाख 60 हजार चौरस फुटाच्या मुख्य मंडपात 11 हजार प्रेक्षकांची बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. यात पुस्तक विक्रीचे 350 स्टॉल्स उभारण्यात आले आहेत.