सायन-पनवेल हायवेवर खारघर इथे वाहतूक कोंडी, प्रवासी मेटाकुटीला
विनायक पाटील, एबीपी माझा, नवी मुंबई | 12 Apr 2019 11:08 PM (IST)
या मार्गावर पावसाळ्यात खड्ड्यांचे साम्राज्य असल्याने वाहनचालक मेटाकुटीला आले होते. अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाने ज्या ठिकाणी डांबरीकरण केले होते तिथे सिमेंटचा रस्ता बनवण्याचा निर्णय घेतला आहे.
नवी दिल्ली : नवी मुंबईमधील खारघरमध्ये गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. नवी मुंबईतून सायन-पनवेल हायवेवर सार्वजनिक बांधकाम विभागाने काम हाती घेतल्याने ही कोंडी होत आहे. यामुळे प्रवाशांना तासन् तास रांगांमध्येच घालवावे लागत आहेत. या मार्गावर पावसाळ्यात खड्ड्यांचे साम्राज्य असल्याने वाहनचालक मेटाकुटीला आले होते. अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाने ज्या ठिकाणी डांबरीकरण केले होते तिथे सिमेंटचा रस्ता बनवण्याचा निर्णय घेतला आहे. नेरुळ, खारघर, कोपरा इथल उड्डाणपुलावर काम हाती घेण्यात आलं आहे. यामुळे एक मार्गिका बंद ठेवण्यात आली आहे. त्यामुळे संध्याकाळच्या वेळी पनवेलच्या मार्गिकेवर तर सकाळच्या वेळीस मुंबईला येणाऱ्या मार्गिकेवर खारघर इथे वाहतूक कोंडीला सामोरं जावं लागत आहे.