मुंबई : गेल्या 12 तासांपेक्षा जास्त काळ मुंबईतून बाहेर जाणाऱ्या महामार्गांवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. जुना मुंबई-आग्रा हायवे, जुना मुंबई-पुणे हायवे, मुंबई-नाशिक हायवेवर मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जॅम झालं आहे.


मुंब्रा-शीळफाटा, काल्हेर-कशेळी-कल्याण, माजीवडा नाका, माणकोली नाका या परिसरात अवजड वाहतुकीमुळे वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. त्यामुळे ठाण्यातून बाहेर पडणारे सगळे रस्ते जॅम झाले आहेत

तर मुंबई-नाशिक हायवेवर तीन अवजड वाहने काही अंतरावर भररस्त्यात बंद पडल्याने रांजणोली नाक्याकडून खारेगाव टोलनाक्याकडे येणारी वाहतूक मंदावली आहे. परिणामी काल्हेर, कल्याण-भिवंडी, मुंब्रा, शिळफाट्यापर्यंत वाहतूक धिम्या गतीने सुरु आहे.

मुंब्रा बायपास-शीळफाटा परिसरातील रस्त्यावर दोन दिवसांच्या पावसामुळे मोठे खड्डे पडले आहे. परिणामी रेतीबंदर रस्त्यावर पाणी साचल्याने जुना मुंबई-पुणे हायवे जॅम झाला आहे.

ठाण्यात येणाऱ्या अवजड वाहनांच्या रांगा पनवेलपर्यंत असल्याची माहिती आहे. त्यामुळे सात ते आठ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.

याशिवा रॅन्समवेअर हल्ल्यामुळे जेएनपीटी बंदरात कंटेनर्सची वाहतूक ठप्प आहे. त्यामुळे अनेक कंटेनर्स बाहेर अडकले आहे. त्यामुळेही वाहतूक कोंडीत भर पडली आहे.