या मार्गांवर वाहतूक कोंडी
- ठाणेः खारीगाव टोलनाका-माणकोली नाका-भिवंडी
- काल्हेर-कशेळी- पुर्णा- राहनाळ- दापोडा- भिवंडी
- वसई-खारगाव-आंजूर फाटा-भिवंडी
- खारीगांव-कळवा रोड- मुंब्रा
या रस्त्यांवर नजर पूरेल तिकडे वाहनांच्या रांगा पाहायला मिळत आहेत. यामध्ये रुग्णवाहिका, शाळकरी विद्यार्थी आणि अनेक चाकरमाने अडकून आहेत. गेल्या 15 दिवसांपासून या मार्गावर वाहतूक कोंडी होत आहे. मात्र सध्या या वाहतूक कोंडीने उग्र रुप धारण केलं असून अनेकांना संपूर्ण रात्र वाहतूक कोंडीत घालावी लागत आहे.