मुंबई : मुंबईसह उपनगरात पावसाची जोरदार बॅटिंग सुरु आहे. त्याचा परिणा रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर झाला आहे. त्यातच पूर्व द्रुतगती मार्गावर अमर महाल जंक्शनजवळ ट्रक उलटल्याने कुर्ल्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक धीम्या गतीने सुरु आहे.

 

 

तर पश्चिम उपनगरांत मुसळधार पावसामुळे पश्चिम द्रुतगती मार्गावर अनेक ठिकाणी वाहतुकीचा वेद मंदवला आहे.

 

 

पावसामुळे पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल वाहतूकही धिम्या गतीने सुरु आहे. लोकल गाड्या सुमारे 10 ते 15 मिनिटं उशिराने धावत आहेत. तर मध्य रेल्वेची लोकल वाहतूकही 10 ते 15 मिनिटे उशिराने सुरु आहे.

 

 

याशिवाय नवी मुंबईत रात्रीपासून थांबून-थांबून मुसळधार पाऊस सुरु आहे. परिणामी हार्बरच्या अप आणि डाऊन मार्गावरील गाड्यांचा वेग मंदावला आहे. लोकल वाहतूक 10 ते 15 मिनिटं उशिराने सुरु आहे.