व्यंगचित्रांचे ठाकरी फटकारे आता फेसबुकवर, टीझर लॉन्च
एबीपी माझा वेब टीम | 19 Sep 2017 11:28 PM (IST)
राज ठाकरेंच्या फेसबुक एन्ट्रीचा टीझर नुकताच मनसेच्या अधिक-त ट्विटर हँडलवरुन टीझर लॉन्च करण्यात आला आहे.
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे 21 सप्टेंबरला फेसबुकवरुन भेटीला येणार आहेत. घटस्थापनेचा मुहूर्त साधत राज ठाकरे फेसबुकवर एन्ट्री घेत आहेत. राज ठाकरेंच्या फेसबुक एन्ट्रीचा टीझर नुकताच मनसेच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन लॉन्च करण्यात आला आहे. “व्यंगचित्रांचे ठाकरी फटकारे अन् दांभिकतेवर गरजणारी 'राज'गर्जना आता फेसबुकवर” असे टीझरच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे. त्यामुळे राज ठाकरेंनी रेखाटलेली व्यंगचित्र फेसबुकच्या माध्यमातून कुणा-कुणावर वार करतात, याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. 21 सप्टेंबरला म्हणजेच घटस्थापनेच्या दिवशी दादरमध्ये खास कार्यक्रमात राज ठाकरेंच्या फेसबुक पेजची सुरुवात करण्यात येणार आहे. आता सोशल मीडियाच्या माध्यमातून राज ठाकरे तरुणांशी थेट जोडले जाणार आहेत. पाहा व्हिडीओ : https://twitter.com/mnsadhikrut/status/910166132199268352