मुंबई : हवामान खातं आणि वेधशाळेच्या अंदाजानंतर मंगळवारी रात्रीपासून  मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये मुसळधार पाऊस बरसत आहे. मुसळधार पावसाने हिंदमाता परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी तुंबल्याचं पाहायला मिळालं. यात गाड्याही तरंगतांना दिसल्या. तर तिकडे सायनच्या गांधी मार्केट परिसरात गुडघाभर पाणी साचलेलं आहे.


मुंबईतल्या लालबाग, परेल, दादर, सायन, कुर्लासह मुलुंड, भांडुप, पवई, अंधेरी, गोरेगाव या उपनगरांमध्येही जोरदार सरी बरसत आहेत. रात्रभर अनेक भागांमध्ये पावसाचा जोर वाढलेला दिसला. दरम्यान, रात्रीपासूनच्या दमदार पावसामुळे रस्त्यावरील वाहनांना मोठ्या अडचणी येत असल्याचं चित्र होतं. अनेक ठिकाणी पावसाचं पाणी गाड्यांमध्ये जाऊन नुकसान झालं आहे.

Igatpuri Waterfall | वीकेंडचा आनंद लुटायचाय...इगतपुरीला चला! | नाशिक | ABP Majha



पावसाचा रेल्वेवरही परिणाम 

रात्रभर कोसळत असलेल्या पावसाचा फटका मुंबईच्या लाईफ लाईनलाही बसला आहे. मुसळधार पावसामुळे रेल्वे रुळावरही पाणी साचायला सुरुवात झालीय. सायनमध्ये रेल्वे रुळांवर पाणी साचलंय. मात्र त्याचा अजून तरी वाहतुकीवर कुठलाही परिणाम झाला नाही, सध्या तिन्ही मार्गावरील वाहतूक सुरळीत सुरु आहे.

26 आणि 27 जुलैला अतिवृष्टीचा इशारा

26 जुलै आणि अतिवृष्टी हे समीकरण पुन्हा एकदा कायम राहणार असल्याची चिन्ह दिसत आहेत. कारण 26 आणि 27 जुलैला मुंबईत मुसळधार पाऊस होणार असल्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. तसेच आज आणि उद्याही मुंबईत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईप्रमाणे कोकणातही जोरदार पाऊस बरसणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

Heavy Rain Mumbai | मुंबईत 26,27 जुलैला मुसळधार सरी कोसळणार- हवामान विभाग | ABP Majha