मुंबईः सकाळपासून विश्रांती घेतलेल्या वरुणराजाने पुन्हा जोर धरला आहे. मुंबईसह पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्ये सध्या जोरदार पाऊस सुरु आहे. या पावसाचा रस्ते वाहतुकीसह रेल्वे वाहतुकीवरही परिणाम झाल्याचं दिसत आहे.

 

ठाणे, पवई, मुलुंड या भागात तासाभरापासून मुसळधार पाऊस सुरु आहे. तर कांदिवली, मीरो रोड, बोरिवली, दहिसर या भागातही जोरदार पावसाने हजेरी लावली आहे.

 

कुर्ला ते कलिना, बीकेसी या मार्गांवर मोठ्या प्रमाणात वाहनांची कोंडी झाली आहे. तर मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेवर देखील पावसाचा परिणाम झाला आहे.

 

पावसामुळे मध्य रेल्वे 20 मिनीटे उशीराने धावत आहे. तर पश्चिम रेल्वे 10 मिनीट उशीराने धावत आहे.