मुंबई: मुंबई शहरासह उपनगरात पावसाचा जोर कायम आहे. मुंबईसह ठाणे, कल्याण, नवी मुंबईत पावसाची दमदार बॅटिंग सुरु आहे.
काही ठिकाणी काल रात्रभर उसंत घेतलेल्या पावसाने आज सकाळपासून जोरदार बरसायला सुरुवात केली आहे. याचा परिणाम रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवर झाला आहे.
लोकल सेवेवर परिणाम
या पावसाचा परिणाम रेल्वे सेवेवर पाहायला मिळत आहे. मुंबई लोकलच्या मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावरील लोकल वाहतूक 10 ते 15 मिनिटं उशिराने सुरु आहे.
पाणी साचल्याने रस्ते वाहतूक खोळंबली
तर माटुंगा, लोअर परळ, घाटकोपर, अंधेरी यासारख्या भागात पावासाचं पाणी साचल्यामुळे रस्ते वाहतुकीवर परिणाम झालेला दिसत आहे. अंधेरी सब वेमध्ये आजही पाणी साचल्यामुळे हा मार्ग बंद करण्यात आला आहे.