हेडलाईन्स: 


1. मुंबईत पावसाची रात्रभर संततधार, नवी मुंबई ठाण्यासह उपनगरांमध्ये मुसळधार पाऊस, मध्य रेल्वेचीही सेवा 10 मिनिटे उशीराने

 

2. नो हेल्मेट नो पेट्रोल संकल्पनेला 5 ऑगस्टपर्यंत स्थगिती, फामपेडा आणि लोकांच्या विरोधानं सरकारची माघार, रावते आणि मुख्यमंत्र्यांमध्येही शीतयुद्ध

 

3. इन्कम टॅक्स भरण्यासाठी मुदतवाढ, 5 ऑगस्टपर्यंत रिटर्न्स भरण्याची मूभा, करदात्यांना दिलासा

 

4.जयदेव ठाकरेंच्या प्रकरणावर कुठलीही तडजोड नाही, राज ठाकरेंच्या भेटीवर उद्धव ठाकरेंनी सुनावलं, राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्कांना उधाण

 

5. शिवसेनेच्या आक्रमक पवित्र्यानंतर भाजपचं एक पाऊल मागे, साई संस्थानमध्ये सेनेच्या मिर्लेकरांना उपाध्यक्षपद देण्याची तयारी

 

 

6. मायावतींवर अश्लील शेरेबाजी करणाऱ्या भाजप नेत्याला अटक, बिहारच्या बक्सरमध्ये दयाशंकर सिंहविरोधात कारवाई,

 

7. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, आदर्श इमारत लष्कराच्या ताब्यात, मंत्री, नेते अखेर बेघर झाले, इमारत बेकायदेशीर असल्यावर शिक्कामोर्तब

 

8. भारत आणि वेस्ट इंडिजमध्ये आजपासून दुसरा कसोटी सामना, पहिल्या सामना जिंकल्यानंतर टीम इंडिया दुसऱ्या सामन्यासाठी सज्ज