मुंबई : मनसेतून शिवसेनेत दाखल झालेल्या सहा नगरसेवकांना तूर्तास दिलासा मिळाला आहे. कारण, कोकणचे आयुक्त जगदीश पाटील गैरहजर राहिल्यामुळे ही सुनावणी पुढे ढकलली आहे.

यानंतर आता मनसे आक्रमक झाली आहे. कोकण आयुक्त हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हातचं बाहुलं आहेत, अशा शब्दात मनसे नेते संदीप देशपांडे यांनी टीका केली.

मनसेतून दिलीप लांडेंच्या नेतृत्वात सहा नगरसेवक शिवसेनेत दाखल झाले. त्याला मनसेने कोकण आयुक्तांकडे आव्हान दिलं. याप्रकरणाचा निकाल तीन महिन्यात येणं अपेक्षित होतं. मात्र चार महिन्यानंतरही निकाल आला नाही. सातत्याने आयुक्त गैरहजर राहत असल्यामुळे त्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

दिलीप लांडे, हर्षला मोरे, दत्ता नरवणकर, अर्चना भालेराव, परमेश्नर कदम, अश्विनी माटेकर या सहा नगरसेवकांनी मनसेला सोडून शिवसेनेत प्रवेश केला होता.

संबंधित बातमी :

पालघरचा बदला भाजप 'त्या' सहा नगरसेवकांच्या रुपाने घेणार?