नेमकं काय प्रकरण आहे?
एचडीएफसी बँकेच्या शाखेने रात्री बँकेबाहेर कुणी बसू नये, झोपू नये म्हणून अनुकुचिदार टोक असणाऱ्या खिळ्यांची जाळी बसवली होती. मुंबईतील फोर्ट भागात एचडीएफसी बँकेची ही शाखा आहे. बँकेच्या या असंवेदनशीलपणावर सोशल मीडियावर जोरदार टीका सुरु झाली.
अखेर एबीपी माझाने ही बातमी दाखवल्यानंतर बँकेने ही अणुकुचिदार टोक असणारी जाळी काढून टाकली. या जाळीमुळे कुणाचा जीवही जाऊ शकत होता, इतकी भयानक जाळी होती.
पाहा व्हिडीओ :