मार्च एण्डचा मुहूर्त, चेक डिलिव्हरी बॉईजचं आंदोलन, 800-900 कोटीचे चेक थकले!
एबीपी माझा वेब टीम | 26 Mar 2018 03:23 PM (IST)
एचडीएफसी बँकेचे चेक देणाऱ्या डिलिव्हरी बॉईजनी कामबंद आंदोलन सुरु केलं आहे.
मुंबई: आर्थिक वर्षाच्या शेवटी जमा-खर्चाचा हिशेब लावण्यासाठी सर्वत्र आकडेमोड सुरु आहे. बँकांची तर घाईगडबड सुरु आहे. मात्र मार्च एण्डचा मुहूर्त साधत एचडीएफसी बँकेचे चेक देणाऱ्या डिलिव्हरी बॉईजनी कामबंद आंदोलन सुरु केलं आहे. पगारवाढ न झाल्यानं हे आंदोलन करण्यात येत आहे. त्याचाच भाग म्हणून आंदोलक कर्मचाऱ्यांनी चेक न पोहोचवण्याचा निर्णय घेतला आहे. महत्त्वाचं म्हणजे या आंदोलनामुळे बँका आणि ग्राहक चांगलेच कात्रीत सापडले आहेत. कारण आंदोलक डिलिव्हरी बॉईजकडे थोडे थोडके नव्हे तर जवळपास 800 ते 900 कोटी रुपयांचे चेक असल्याचं सांगण्यात येत आहे. अनेकांनी मार्च एण्डच्या पार्श्वभूमीवर आपले चेक खात्यात भरण्यासाठी विविध एटीएम किंवा तत्सम ठिकाणी भरले आहेत. मात्र हे चेक बँकांपर्यंत पोहोचविण्याचं काम करणारे डिलिव्हरी बॉईजनी, आपल्या मागण्या मान्य करुन घेण्यासाठी मार्चअखेरचा मुहूर्त साधला. त्यामुळे अनेक खातेदारांचे चेक अडकले आहेत. दरम्यान, मनसे कामगार युनियनने या मोर्चाला पाठिंबा दिला आहे.