Navratri 2022 : दांडीया क्वीन फाल्गुनी पाठक (Falguni Pathak) यांच्या गरबा (Garba) कार्यक्रमाला हायकोर्टानं (High Court) हिरवा कंदिल दिला आहे. या कार्यक्रमावर आक्षेप घेत एका खेळाच्या मैदानाचं व्यावसायिकीकरण रोखण्याची मागणी करत हायकोर्टात  दाखल करण्यात आलेली याचिका हायकोर्टानं फेटाळून लावली आहे. त्यामुळे बोरिवलीच्या (Borivali Ground) चिकूवाडी परिसरातील स्वर्गीय प्रमोद महाजन मैदानात यंदा फाल्गुनी पाठक यांचा दांडीया रास (Dandiya Raas) जोरदार रंगणार आहे.


सामाजिक कार्यकर्ते विनायक सानप यांनी ही याचिका दाखल करताना केवळ याचिकाकर्त्यांनी केवळ या एकाच कार्यक्रमाला का टार्गेट केलं आहे?, मुळात त्या परिसरात आसपासच्या मैदानांवर अनेक अश्याचप्रकारचे कार्यक्रम होतात. परंतु त्यांच्याबद्दल याचिकेत कुठेही उल्लेख केलेला नाही. साल 2019 मध्येही याचिकाकर्त्यांनी याच मुद्यावर अशीच याचिका केली होती, जी फेटाळण्यात आली तरीही याचिकाकर्त्यांनी पुन्हा तेच केलंय. तसेच याचिकाकर्त्यांनी कार्यक्रमाचे आयोजक साई गणेश वेलफेअर असोसिएशन यांना यात प्रतिवादी का बनवलेलं नाही? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कार्यक्रम अवघ्या काही दिवसांवर आलेला असताना जनहीत याचिका घेऊन कोर्टात येणं अयोग्य आहे. त्यामुळे मुद्दा जरी योग्य असला तरी या याचिकेत आम्हाला तथ्य दिसत नाही, असा शेरा मारत मुख्य न्यायमूर्ती दिपांकर दत्त आणि न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या खंडपीठानं ही याचिका फेटाळून लावली.


काय आहे याचिका?


मुंबई महानगरपालिकेनं (BMC) बोरीवली (Borivali) येथील स्वर्गीय प्रमोद महाजन क्रीडा संकुल (Late Shri Pramod Mahajan Sports Complex) येथील भुखंड खेळाचं मैदान म्हणून निश्चित केलेला आहे. पण, या मैदानावर नवरात्र उत्सवानिमित्त फाल्गुनी पाठक यांच्या गरबा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आल्याचं वृत्त एका वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्यात आलं होतं. याची नोंद घेत सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार विनायक सानप यांनी फाल्गुनी पाठक यांच्या गरब्याच्या कार्यक्रमावर जोरदार आक्षेप घेतला होता. या कार्यक्रमासाठी 800 ते 4200 रुपयापर्यंत तिकिटाचे दरही निश्चित करण्यात आल्याचा आरोप करत या आयोजनाला याचिकेतून आक्षेप घेतला होता.


हे खेळाचं मैदान सर्वांसाठी खुलं असताना अशी प्रकारे तिथं कार्यक्रमाचं आयोजन करून त्याचं व्यावसायिकीकरण केलं जाऊ नये, अशी मागणी याचिकेतून व्यक्त करण्यात आली आहे. तसेच या कालावधीत संगीत कार्यक्रम अथवा नवरात्रोत्सवात गरब्यासाठी या क्रिडांगणाचा वापर होत असेल तर मैदानावर सर्वांना विनामूल्य प्रवेश देण्यात यावा, अशी मागणीही याचिकेतून करण्यात आली होती.


महत्त्वाच्या इतर बातम्या :