मुंबईः पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्ग 19 ऑगस्टपर्यत खड्डेमुक्त करा, असे आदेश मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारला दिले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे या दोन्ही महामार्गावर फक्त 137 खड्डे असल्याची माहिती राज्य सरकारने कोर्टात दिली आहे.
खड्ड्यांवरील सुनावणी दरम्यान शुक्रवारी राज्य सरकारने या दोन्ही महामार्गांवरील 3247 खड्डे बुजवल्याचा दावा केला होता. मात्र कोर्टाने याप्रकरणी न्यायालयीन मित्राला पाहणी करण्याचे आदेश दिले. त्यामुळे गडबडलेल्या सरकारी वकिलांनी पुन्हा या महामार्गांवर 137 खड्डे पडल्याची माहिती कोर्टाला दिली.
दरम्यान हायकोर्टाने सरकारला खड्ड्यांच्या प्रश्नावरुन चांगलंच ठणकावलं आहे. मुंबईतील पूर्व आणि पश्चिम द्रुतगती मार्ग 19 ऑगस्टपर्यंत खड्डेमुक्त झाले पाहिजेत, अशा शब्दात कोर्टाने बजावलं आहे.