मुंबई: दक्षिण मुंबई परिसरात आमदारांचं हक्काचं निवासस्थान म्हणून ओळखंल जाणारं मनोरा आमदार निवास पाडण्यात येणार आहे.
सुमारे 20 वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या या इमारतीचा दर्जा खराब असल्याचा अहवाल देण्यात आल्यामुळे, ही इमारत आता पाडण्यात येणार आहे.
गेल्या दोन वर्षांपासून या इमारतीच्या दर्जाबद्दल अनेक तक्रारी करण्यात आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर विधानपरिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर, विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सार्वजनीक बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यात बैठक झाली.
या बैठकीत ही इमारत टप्प्याटप्प्याने पाडून तीची पुनर्बांधणी करण्याचं ठरवलं आहे. काही महिन्यांपूर्वी या इमारतीचं स्ट्रक्चरल ऑडीट करण्यात आलं होतं, ज्यात ही इमारत धोकादायक असल्याचं पुढे आलं होतं.