तक्रारदाराने हायकोर्टात आपली बाजू मांडताना कोर्टाला सांगितलं की, 15 दिवसांचा अवधी देण्यात येऊनही पुरावे सादर न करता डॉ. शिवाचार्य यांनी वेळोवेळी विविध कारणे सांगून वेळ मागून घेतला. अद्यापही त्यांनी पुरावे सादर केलेले नाहीत. इतकंच काय तर आधी आपलं जातप्रमाणपत्र कोर्टात जमा आहे, असा दावा त्यांनी केला होता आणि काही दिवसांनी तो केरळमध्ये प्रवासादरम्यान हरवल्याची माहिती दिली. त्यामुळे बचावाची पूर्ण संधी असूनही त्यांनी केवळ वेळकाढूपणा केला. तर शिवाचार्य यांच्याकडे साल 1982 मधील जातीच्या दाखल्याची केवळ झेरॉक्स प्रत असून त्याची मूळप्रत अद्याप त्यांनी सादर केलेली नाही. त्यामुळे सरकारी अधिकाऱ्यांनी पूर्ण तपासाअंती हा जातीचा दाखला बोगस असल्याचा अहवाल सादर केला आहे, अशी माहिती सरकारी वकिलांनी हायकोर्टात दिली.
लोकसभा निवडणुकीत प्रतिस्पर्धींचा पराभव करुन भाजपचे डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी तथा नूरदय्यास्वामी या हिरेमठ विजयी झाले आहेत. खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांच्या शाळेच्या दाखल्यावर हिंदू लिंगायत असा उल्लेख असून त्यांनी बेडा जंगम जातीचा बनावट दाखला तयार केला आहे, असा आरोप करत अपक्ष उमेदवार आणि माजी महापौर प्रमोद गायकवाड यांनी सोलापूर जिल्हा जात पडताळणी समितीकडे तक्रार केली आहे. जात पडाळणी समितीने डॉ. शिवाचार्य यांनी जोडलेल्या कागदपत्रांची तपासणी करण्यासाठी दक्षता समिती नियुक्त केली. त्यानंतर या समितीने कागदपत्रांची माहिती घेत डॉ. शिवाचार्य यांचे जात प्रमाणपत्र बोगस असल्याचं ठरवत हे जात प्रमाणपत्र रद्द केले. तसेच तहसीलदारांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. या निर्णयाविरोधात डॉ. शिवाचार्य यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
Jay Siddheshwar Maharaj | खासदार जयसिद्धेश्वर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे सोलापूर न्यायालयाचे आदेश