मुंबई : कोरोना व्हायरसचे गंभीर परिणाम जगभरात धुमाकुळ घातला आहे. आता त्याचा शिरकाव आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतही पाहायला मिळत आहे. याचा परिणाम आज थेट शेअर बाजारात दिसून आला. कोरोना आणि आंतरराष्ट्रीय बाजारातली घसरण यामुळे शेअर बाजारही गडगडला. सेन्सेक्स 2300 पेक्षा जास्त अंकांनी तर निफ्टी 700पेक्षा जास्त अंकांनी कोसळला. मागच्या काही दिवसांपासून शेअर बाजार सातत्याने कोसळत आहे.


जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनाला महारोगराई जाहीर केल्यानंतर जगभरातल्या गुंतवणूकदारांमध्ये गोंधळाचं वातावरण पसरल आहे. त्यातच भारतात कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने त्याचे पडसाद शेअर बाजारात उमटले. त्यातच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुढच्या महिन्याभरासाठी युरोपमधून अमेरिकेत प्रवासबंदी जाहीर केली आहे. त्याचा फटकाही शेअर बाजाराला बसला आहे.

दरम्यान, बुधवारी मुंबई शेअर बाजार बंद झाला तेव्हा निर्देशांक, 35,697 एवढा होता. आज सकाळी सुरुवातीलाच बाजारात 1600 अंकांची घसरण पाहायला मिळाली.

सेन्सेक्समधील पाच वेगवान शेअर

हीरो मोटोकॉर्प (4.08 टक्के)

रिलायन्स (3.60 टक्के)

आयसीआयसीआय बँक (1.80 टक्के)

हिंदुस्तान यूनिलीवर (1.47 टक्के)

एल अँड टी (1.35 टक्के)

#Coronavirus | शेअर बाजार उघडताच सेन्सेक्स 1200 अंकानी कोसळला



कोरोना व्हायरस महामारी म्हणून घोषित

कोरोना व्हायरस जगातील 100 देशांमध्ये फोफावला आहे. या व्हायरसमुळे आतापर्यंत जगभरात चार हजारांहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) कोरोना व्हायरसने जगात महामारी म्हणून घोषित केलं आहे. तसंच कोरोनाविरोधात संपूर्ण जगाने आता एकजूट होऊन लढावं, असं आवाहनही जागतिक आरोग्य संघटनेने केलं आहे.

परदेशातून येणाऱ्यांचे व्हिसा रद्द

परदेशातून भारतात येणाऱ्यांचे व्हिसा 15 एप्रिलपर्यंत सस्पेंड करण्यात आले आहेत. यामधून राजनीतीज्ञ आणि यूएन कर्मचाऱ्यांना वगळण्यात आलं आहे. चीन, इटली, इराण, दक्षिण कोरिया, फ्रान्स, स्पेन आणि जर्मनीमधून येणारे भारतीय 14 दिवसांसाठी देखरेखीखाली असतील.

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर आर्थिक आयोगने 13 मार्च रोजी होणारी राज्यांच्या अर्थमंत्र्यांसोबतची बैठक रद्द केली आहे. एअर इंडियाने इटलीला जाणारी विमानं 28 मार्च आणि दक्षिण कोरियाला जाणारी विमानं 25 मार्चपर्यंत रद्द केली आहेत. इटलीमध्ये कोरोनामुळे आतापर्यंत 827 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 12462 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.