कुर्ला स्टेशनजवळ रेल्वे रुळाला तडे, हार्बर रेल्वे अर्धा तास उशीरानं
अक्षय भाटकर, एबीपी माझा, मुंबई | 19 Sep 2016 09:12 AM (IST)
मुंबई: हार्बर मार्गावरील कुर्ला स्थानकाजवळ रुळाला तडे गेल्यान रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे वाशीहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या रेल्वे तब्बल अर्धा तास उशीरानं धावत आहेत. रेल्वेमार्ग दुरुस्त झाल्यानंतरही ही हार्बर रेल्वे विस्कळीतच आहे. वाहतूक पूर्ववत करण्याचे हार्बर रेल्वेचे प्रयत्न सुरु आहे. वाशीहून मुंबईच्या दिशेने मोठ्या प्रमाणात प्रवासी प्रवास करतात. त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाल्यानं सकाळीच प्रवाशांना बराच मनस्ताप सहन करावा लागला आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी हार्बर रेल्वेनं उशीरानं धावत असल्यानं प्रवाशांमध्ये बरीच नाराजी पाहायला मिळत आहे. दरम्यान, हा बिघाड दुरुस्त करण्यात आला आहे.