जम्मू-काश्मीर : कुपवाड्यातील लष्करी तळावर दहशतवादी हल्ला, गेल्या 15 मिनिटांपासून गोळीबार सुरु


------------------------------------------

नवी दिल्ली : डिसेंबरमध्ये होणाऱ्या सार्क परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी पाकिस्तानात जाणार नाहीत

------------------------------------------

उरी हल्ल्याबाबत लवकरच सर्वपक्षीय बैठक, पाकिस्तानवर कारवाईबाबत चर्चा होणार - सूत्र

------------------------------------------

लष्कराला कारवाई करण्यास राजकीय मंजुरी, दहशतवादी हल्ल्याला उत्तर देण्यासाठी सरकारचा आक्रमक पवित्रा – सूत्र

------------------------------------------

पुणे : इंदापुरात तृतीयपंथीयाची गळा चिरुन हत्या, सरडेवाडी टोल नाक्याजवळील उसाच्या शेतात आढळला मृतदेह

------------------------------------------

वर्ध्यात विजांच्या कडकडाटासह दमदार पावसाची

------------------------------------------

मुंबई - मंत्रालयाजवळील यशोधन या IAS अधिकाऱ्यांच्या इमारतीत डेंग्यूच्या अळ्या सापडल्या, महापालिकेकडून अळ्या नष्ट
------------------------------------------

वसई : केवळ मुस्लिम असल्यामुळे फ्लॅट नाकारला, हॅप्पी जीवन सोसायटीच्या सचिवासह आठ जणांना अटक, दोन महिलांचा समावेश, माणिकपूर पोलिसांची कारवाई

---------------------

उरी हल्ल्यातील शहीद जवानांची संख्या 18 वर, उपचारादरम्यान आणखी एक जवान शहीद

---------------------

उरी हल्ल्यातील तीन शहीदांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारकडून प्रत्येकी 15 लाखांची मदत

---------------------

ठाण्यात इमारतीच्या लिफ्टमध्ये अडकलेल्या तिघांना बाहेर काढण्यात अग्निशमन दलाला यश

---------------------

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांच्यावर शाईफेक

---------------------

ठाण्यात इमारतीच्या लिफ्टमध्ये तिघे अडकले, अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांकडून तिघांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु

---------------------

उरीमध्ये पुन्हा एकदा स्फोटाचा आवाज, लष्कर मुख्यालयाजवळ जोरदार स्फोटाचा आवाज

---------------------

जालन्यात मराठा समाजाच्या मूक मोर्चामध्ये रावसाहेब दानवेंची हजेरी, लातूरसह अकोल्यातही आज मोर्चे

---------------------

उरी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सकाळी 10 वा. उच्चस्तरीय बैठक, संरक्षणमंत्री, एनएसए यांच्यासह गृहसचिव, रॉ, आयबी प्रमुखही बैठकीला उपस्थित राहणार

---------------------

हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत, कुर्ल्याजवळ रेल्वे रूळाला तडे गेल्यानं वाशीहून मुंबईच्या दिशेने येणारी वाहतूक अर्धा तास उशिरानं

---------------------

वाशिममध्ये भरधाव गाडीची तिघांना धडक, रिसोड-वाशिम महामार्गावर सवड फाट्यावर अपघात, तिघांचा जागीच मृत्यू


---------------------

1 . जम्मूतील उरीमधल्या लष्करी मुख्यालयावर दहशतवादी हल्ला, 17 जवान शहीद तर पाकच्या 4 दहशतवाद्यांना कंठस्नान, 12 दहशतवादी अजूनही काश्मीरात मोकाट असल्याची भीती

---------------------

2 . पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची भारताला अण्विक हल्ल्याची धमकी, खाजगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत खळबळजनक वक्तव्य

---------------------

3 . काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे महाराष्ट्रवरही शोककळा, सातारा, नाशिक आणि अमरावतीचे सुपुत्र शहीद

---------------------

4 . काश्मीरमधील सततच्या हल्ल्यावरुन सामनातून केंद्र सरकारवर शरसंधान, हे अपयश कोणाचे, असा खडा सवाल

---------------------

5 . मराठा समाजाच्या आरक्षणावर आज निर्णय, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे महाराष्ट्राचं लक्ष

---------------------

6 . नांदेडमधील मराठ्यांच्या मूक मोर्चाला ऐतिहासिक गर्दी.. आजही लातूर, जालना आणि अकोल्यात मराठा क्रांती मोर्चांचं आयोजन

---------------------

7 . दिघ्यातील कोर्ट रिसिव्हरच्या ताब्यात असलेल्या इमारती खाली करण्याच्या नोटिसा, अमृतधाम, दुर्गामाता, अवधूत छाया आणि दत्तकृपा इमारतींचा समावेश

----------------------

8 . 48 तासांत 6 हत्या, मुलुंडमध्ये 7 वर्षीय मुलीची लैंगिक अत्याचार करून हत्या, नाशिक आणि यवतमाळमध्ये पतीनं पत्नीला संपवलं, तर नागपुरात हत्येचा सपाटा

----------------------

9 . नव्वदाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनाचा मान डोंबिवलीला, 7 शहरांना मागे टाकून डोंबिवलीची सरशी,

----------------------

10 . प्रेक्षकांच्या नजरेची मला पर्वा नाही, पार्च्डमधल्या न्यूड सीनवर राधिका आपटेची एबीपी माझाला बोल्ड प्रतिक्रिया

----------------------

एबीपी माझा वेब टीम