Harbour Line : पनवेल रेल्वे स्थानकातील बिघडलेली सिग्नल यंत्रणा दुरूस्त केल्याने रेल्वे सेवा सुरळीत सुरू झाली आहे. मध्ये रेल्वेचे जनसंपर्क अधिकाऱ्यांनी लोकल सेवा सुरळीत झाल्याची माहिती दिली आहे. लोकल सेवा सुरळीत मात्र उशीराने सुरु आहे. दरम्यान, त्यांनी ट्वीट करत या बिघाडाचे कारणही सांगितले आहे. काही समाजकंटकांनी सिग्नलच्या वायर,लोकेशन बॉक्स तोडल्यामुळे ही अडचण निर्माण झाली होती. मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी ट्टीट करत सांगितलं आहे की, 'काही समाजकंटकानी पनवेल येथील ट्रॅकजवळ सिग्नल यंत्रणा, लोकेशन बॉक्स आणि केबल्सचे नुकसान केले. यामुळे पनवेलजवळील सिग्नल यंत्रणा विस्कळीत झाल्याने लोकल सेवा ठप्प झाली होती. मात्र सकाळपासूनच लोकल सेवा सुरळीत सुरु झाली आहे.'

Continues below advertisement




 


महत्त्वाच्या इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha