Petrol-Diesle Price Today on 13 April 2022 : सध्या देशात इंधन दरांनी (Fuel Price) महागाईचा उच्चांक गाठला आहे. एकीकडे पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. तर दुसरीकडे सीएनजी आणि पीएनजीच्या दरांत मोठी वाढ झाली आहे. सातत्यानं वाढणाऱ्या इंधन दरांमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला चाप बसला आहे. भारतीय तेल कंपन्यांनी 6 एप्रिलपासून पेट्रोल (Petrol) आणि डिझेल (Diesel) च्या दरांत कोणतीही दरवाढ केलेली नाही. पेट्रोलियम मार्केटिंग कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOCL) ने आजचे नवे दर जारी केले आहेत. आजही देशातील पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर असून कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
दरम्यान, एप्रिल महिन्यात सलग सातव्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर आहेत. यापूर्वी गेल्या बुधवारी (6 एप्रिल) रोजी पेट्रोल-डिझेल दोन्ही इंधनाच्या दरांमध्ये 80 पैसे प्रति लिटरची वाढ करण्यात आली होती. दरम्यान, 22 मार्चपासून आतापर्यंत पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये 10 रुपये प्रति लिटरची वाढ झाली आहे. तरीही देशातील अनेक शहरांत पेट्रोलच्या किमती 120 रुपये प्रति लिटर पार पोहोचल्या आहेत. तर डिझेलनंही शंभरी ओलांडली आहे.
देशाच्या आर्थिक राजधानीचं शहर असणाऱ्या मुंबईत पेट्रोलचे दर सध्या 120.51 रुपये प्रति लिटरवर स्थिर आहेत. तर डिझेल 104.77 रुपये प्रति लिटरवर स्थिर आहेत. तर देशाच्या राजधानीचं शहर असणाऱ्या दिल्लीमध्ये पेट्रोल 105.41 रुपये प्रति लिटरनं विकलं जात आहे. तर डिझेल 96.67 रुपये प्रति लिटरनं विकलं जातं आहे.
देशात 22 मार्चनंतर सातत्यानं पेट्रोल-डिझेलच्या दरांच्या वाढीचं सत्र सुरु होतं. गेल्या 22 दिवसांत तेलाच्या किमतींमध्ये जवळपास 10 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. जर तुम्हीही तुमच्या गाडीची टाकी फुल करण्याचा विचार करत असाल, तर त्यापूर्वी एकदा तुमच्या शहरांतील दर जाणून घ्या.
शहरं | पेट्रोलच्या किमती (प्रति लिटर) | डिझेलच्या किमती (प्रति लिटर) |
मुंबई | 120.51 | 104.77 |
दिल्ली | 105.41 | 96.67 |
चेन्नई | 110.85 | 100.94 |
कोलकाता | 115.12 | 99.83 |
हैद्राबाद | 119.49 | 105.49 |
कोलकाता | 115.12 | 96.83 |
बंगळुरू | 111.09 | 94.79 |
भारत 85 टक्के आयातीवर अवलंबून
देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्या आहेत, परंतु स्थानिक करांनुसार, त्यांच्या किमती वेगवेगळ्या राज्यांमध्ये बदलतात. क्रिसिल रिसर्चनुसार, आंतरराष्ट्रीय तेलाच्या किमतीत झालेल्या वाढीवर पूर्णपणे मात करण्यासाठी प्रति लिटर 9-12 रुपयांची वाढ आवश्यक आहे. तेलाची गरज भागवण्यासाठी भारत 85 टक्के आयातीवर अवलंबून आहे.
दररोज बदलतात पेट्रोल-डिझेलच्या किमती
आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीच्या आधारे पेट्रोल आणि डिझेलची किंमत दररोज बदलली जाते. तेल विपणन कंपन्या दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींचा आढावा घेऊन दर निश्चित करतात. इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम तेल कंपन्या दररोज सकाळी वेगवेगळ्या शहरांच्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींची माहिती अपडेट करतात.
पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol Diesel Price ) कुठे आणि कसे पाहाल?
इंडियन ऑईलचं IndianOil ONE Mobile App तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.
इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price) सोप्या पद्धतीने पाहता येतील.
पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती ( Petrol Diesel Price ) एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत).
महत्त्वाच्या इतर बातम्या :
CNG Price Hike : महागाईचा दुहेरी हल्ला; सीएनजी पाच रुपयांनी तर PNG साडेचार रुपयांनी महागला