हार्बर रेल्वेची विस्कळीत झालेली वाहतूक पूर्वपदावर
एबीपी माझा वेब टीम | 03 Sep 2018 08:59 AM (IST)
कामाला जाण्याच्या वेळेलाच हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतुकीचा बोजवारा उडाला.
मुंबई: कामाला जाण्याच्या वेळेलाच हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतुकीचा बोजवारा उडाला. कॉटनग्रीन स्टेशनजवळ ओव्हरहेड वायर तुटल्याने वीजपुरवठा खंडित झाला. परिणामी सीएसएमटी पनवेल आणि सीएसएमटी अंधेरी मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. बिघाड दुरुस्तीनंतर वाहतूक सुरळीत झाली आहे. सकाळी 7 वाजून 20 मिनिटांनी ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड झाला. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली. कॉटनग्रीन स्टेशनवर अनेक प्रवासी लोकलमधून उतरले. ओव्हरहेड वायरचा हा बिघाड सकाळी 8 वाजून 14 मिनिटांनी दुरुस्त झाल्याचं ट्विट मध्य रेल्वेच्या @Central_Railway या अकाऊंटवरुन करण्यात आलं. मात्र सकाळी कामावर जाण्याच्या वेळेलाच लोकल वाहतूक रखडल्याने प्रवाशांना मोठ्या मनस्तापाला सामोरं जावं लागत आहे.