मुंबई : सध्या संपूर्ण जगावर कोरोनाचं सावट आहे. लाखो लोकांचा जीव या भयानक विषाणूनं घेतला आहे. संपूर्ण जग सध्या लॉकडाऊनमध्ये आहे. अश्या परिस्थितीत जगभरातील क्रिकेटरसिकांचा देव भारतरत्न सचिन तेंडुलकरचा आज वाढदिवस. सचिननं कोरोनाची गंभीरता लक्षात घेत यंदा आपल्या वाढदिवसाचं कोणतंही सेलिब्रेशन न करण्याचा निर्णय घेतला. मात्र लॉकडाऊनच्या परिस्थितीतही सचिनच्या डायहार्ड फॅन्सनी त्याला शुभेच्छा पाठवल्या आहेत.


मुंबईतील लालबागमध्ये राहणारा सचिनचा असाच एक जबराफॅन आहे, अभिषेक साटम. अभिषेकनं 'लढूया कोरोना विरुद्ध' असा संदेश देणारं 5.6 x 4 फुटांच एक चित्र बनवलं आहे. ज्यात अर्ध्या इंचाच्या आकाराचे चौकोन वापरण्यात आले आहेत. त्या साठी काळा, निळा, पिवळा, पांढरा, हिरवा, लाल, पोपटी, ह्या रंगाच्या चौकोनाचा वापर केला गेला आहे. एकूण 9637 चौकोनांचा वापर करून 3 बाय 5.6 फुटांची कलाकृती ही कलाकृती अभेषकनं 15 तासांच्या अथक परिश्रमांतून साकारली आहे.




सचिनच्या वाढदिवसाला दरवर्षी अभिषेक काही ना काही आर्टवर्क करून आपल्या या सुपरहिरोला मानवंदना देत असते. पण यंदा लॉकडाऊनच्या पारिश्वभूमीवर यंदा दरवर्षीप्रमाणे काही मोठं आर्ट वर्क करता येणार नाही याची अभिषेकला खंत होती. मात्र तरीही त्यानं विचार करून घरातच काहीतरी करण्याचा निश्चय केला. आबासाहेब शेवाळे आणि प्रतीक घुसळे या आपल्या मित्रांशी त्यानं याबाबत संवाद साधला. आणि आपल्याला यंदा काय करता येईल?, यासंबंधी विचार सुरू झाला आणि एक कल्पना भन्नाट कल्पना सुचली. घरात ज्या वस्तू आहेत त्या वापरूनच एखादी कलाकृती सादर करायचं ठरलं. कलेची आवड असल्याने घरात वेगवेगळ्या रंगाचे कागद होतेच. मग ठरवलं की अशी कलाकृती करूया ज्या मधून सचिनला शुभेच्छा आणि कोरोनाबद्दल जनजागृतीचा संदेशही देता येईल.


हे ही वाचा- BLOG | सचिनच्या खणखणीत करिअरचा फ्लॅशबॅक...पत्रातून..

सगळा विचार करून त्यांनी एक फोटो निवडला जो सध्याच्या परिस्थितीशी मिळता जुळता वाटला. जसा सचिन क्रिकेटमध्ये शॉट मारतो आणि बॉलला झोडपून काढतो, तसंच आता सगळ्यांनीच मिळून कोरोनाला झोडपून काढण्याची गरज आहे. स्वत: सचिनही वेळोवेळी आपल्या व्हिडीओमार्फत सर्वांना कोरोनाशी मुकाबला कसा करता येईल याबद्दल मार्गदर्शन करत असतो. त्यामुळे अश्या लॉकडाऊनच्या परिस्थितीतही मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला अश्या अभिनव शुभेच्छा देणा-या अभिषेकला एबीपीचा सलाम, आणि क्रिकेट जगताच्या या बादशाहला मानाचा मुजरा.