मुंबई : हाजी अली दर्गा ट्रस्टने मुंबई हायकोर्टाच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. दर्ग्यातील मजारवर महिलांना प्रवेशाला हायकोर्टाने दिलेल्या परवानगीविरोधात ट्रस्टने कोर्टाचे दरवाजे ठोठावले आहेत.

महिलांच्या दर्गाप्रवेशाला मनाई करण्याची मागणी हाजी अली दर्गा ट्रस्टने केली आहे. जिथे पुरुषांना जाण्याची परवानगी आहे, तिथे महिलांनाही जाण्याचा अधिकार आहे, असं म्हणत मुंबई हायकोर्टाने हाजी अली दर्ग्यातील महिला प्रवेशावरील बंदी उठवली होती. 26 ऑगस्ट 2016 रोजी मुंबई हायकोर्टाने यासंदर्भात निर्णय दिला होता.

हायकोर्टाच्या निर्णयानंतर भूमिता ब्रिगेडच्या तृप्ती देसाईंनी मुंबई येथील हाजी अली दर्ग्यात प्रवेश केला. पूर्वी महिलांना प्रवेश दिला जात असे, त्या ठिकाणापर्यंतच तृप्ती देसाई यांनी प्रवेश केला. मात्र ट्रस्टला सुप्रीम कोर्टात अपील करण्यासाठी दिलेल्या 6 महिन्यांच्या मुदतीमुळे घालण्यात आलेल्या बंदीचं पालन करत त्या मजारचं दर्शन न घेताच परतल्या.

पुरुषांप्रमाणे महिलांनाही हाजी अली दर्ग्यात प्रवेश मिळावा यासाठी डॉ. नुरजा नियाज आणि इतर संघटनांनी हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली होती. या याचिकेवरील सुनावणी दरम्यान हायकोर्टाने हा ऐतिहासिक निर्णय दिला होता.

संबंधित बातम्याः


हाजी अली दर्ग्यात महिलांनाही प्रवेश, हायकोर्टाचा ऐतिहासिक निर्णय


हाजी अली दर्ग्याचा वाद नेमका काय?


सरकारच्या दबावाला बळी पडून कोर्टाचा हा निर्णय: हाजी अली ट्रस्ट


हाजी अली दर्गा प्रवेश: हायकोर्टाचा नेमका निर्णय काय?