पालघर : आदिवासी समाजाच्या विविध मागण्यांसाठी आज पालघर जिल्ह्यातील वाडामध्ये आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांच्या घराला महाघेराव घालण्यात येणार आहे. अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने हे आंदोलन छेडण्यात आलं आहे.
आदिवासी शेतकरी, देवस्थान शेतकरी आणि जंगल निवासी जनतेचे मूलभूत प्रश्न सोडवण्याची मागणी या आंदोलनातून करण्यात येणार आहे.
याशिवाय पेसा कायदा मंजूर करावा, वनजमिनी नावावर कराव्यात, तांदूळ, वरी आणि नाचणीला योग्य भाव मिळावा, आदिवासी विद्यार्थ्यांच्या वसतीगृहाची अवस्था सुधारावी, अशा अनेक मागण्या या मोर्चामधून करण्यात येणार आहेत.
या मोर्चासाठी पालघर, ठाणे आणि नंदुरबार जिल्ह्यासह राज्यभरातल्या आदिवासी संघटना हजेरी लावणार आहेत.