Gudi Padwa 2022 : शनिवार, 2 एप्रिल रोजी राज्यात गुढीपाडवा (Gudhi Padwa) साजरा होतोय. या सणासाठी निर्बंध घालण्याचा मानस नुकताच जाहीर केला आहे.  यावर भाजप आक्रमक झाला असून हिंदू सणांवर निर्बंध घालू नका, असं म्हणत भाजप आमदार राम कदमांनी (Ram Kadam) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना लिहिलं आहे. 


राम कदमांनी पत्रात म्हटलं आहे की, आपल्या सरकारने पुन्हा एकदा हिंदूंचा अत्यंत महत्वाचा सण गुढी पाडवा आणि राम नवमी यावर निर्बंध घालण्याचा मानस नुकताच जाहीर केलाय. असे जाचक निर्बंध हिंदू सणांवर आपल सरकार का घालतंय? हा महाराष्ट्रातल्या प्रत्येकाचा आपल्या सरकारला सवाल आहे. कोरोनाच्या संकट काळातून सावरत असताना आता कुठे गाडी रुळावर आलीय. लोक त्या भीतीच्या वातावरणातून मुक्त होऊन पारंपरिक पद्धतीनं आपले सण साजरे करत आहेत.  लोकांना मुक्त पणे त्यांचे सण साजरे करू द्यावेत, असं कदमांनी पत्रात म्हटलं आहे.


कदम यांनी म्हटलं आहे की, नागरिक  आपलं जीवनमान सुरळीत जगण्याचा प्रयत्न करत आहेत. स्वत:च्या जीवाची कशी काळजी घ्यायची ते प्रत्येकाला व्यवस्थित माहित आहे. पण सरकारने हे करा, हे नका करू.. असं सांगण्यापेक्षा लोकांना मुक्त पणे त्यांचे सण साजरे करू द्यावेत. आम्हाला आमच्या जीवाची कशी काळजी घ्यायची ते व्यवस्थित ठावूक आहे. होळीच्या वेळेस देखील आपल्या सरकारनं शिमगा साजरा करायचा नाही म्हणत निर्बंध घातले. पोलीस केस करू अशा धमक्या दिल्या. काय झालं सरकारला आमच्या विरोधासमोर सगळे निर्बंध मागे घ्यावे लागले. 


त्यांनी म्हटलं आहे की, सरकारमध्ये अशा कोणत्या शक्ती आहेत कि ज्या हिंदू विरोधी काम करत आहेत. त्यांना हिंदूंचे सण बघवत नाहीत. हिंदू सण आले कि त्यांना निर्बंध आठवतात. हे असे हिंदू विरोधी महाराष्ट्राच्या भूमीत ठेचून काढावेच लागतील. आपल्या सरकारला गुढी पाडवा आणि राम नवमी याच्यावर निर्बंध घालता येणार नाहीत. जर चुकून घातले गेलेत तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला म्हणावे लागेल कि तुमचे निर्बंध गेले चुलीत, असं राम कदम यांनी म्हटलं आहे. 


आम्ही आमचा गुढी पाडवा व राम नवमी आणि येणारे सर्व हिंदू सण थाटात जल्लोषात ढोल ताश्या सहित साजरे करणारच. राज्याचे प्रमुख म्हणून आपल्याकडून अपेक्षा आहे. अशा प्रकारचे कोणतेही हिंदू सणांवरील निर्बंध आपण आणि आपल्या सरकारने घालू नये, असं राम कदम यांनी पत्रात म्हटलं आहे. 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह | ABP Majha






 



संबंधित बातम्या


Gudi Padwa 2022 : शोभायात्रांना परवानगी मिळणार? दोन दिवसांत स्पष्टता, गृहमंत्र्यांची माहिती, तर उत्सव साजरा


Gudi Padwa 2022 : यंदाच्या गुढीपाडव्याचा 'हा' आहे शुभमुहूर्त, जाणून घ्या पूजा, तिथी आणि धार्मिक महत्त्व


Mns Melava: मनसेकडून गुढीपाडव्याला भव्य मेळाव्याचे आयोजन, तिथीनुसार शिवजयंती करणार साजरी