शॉकसर्किटने आग लागल्याचा अंदाज -
माझगाव येथे विक्रीकर भवन आहे. काही वर्षांपूर्वी ते वॅट भवन नंतर आता जीएसटी भवन म्हणून ओळखले जाते. जीएसटी भवनच्या दोन इमारती असून त्यातील एक इमारत 1965 ला दुसरी 1972 ला बांधण्यात आली होती. तळ अधिक नऊ मजली असलेल्या इमारतीच्या नवव्या मजल्यावर आज दुपारी साडेबाराच्या दरम्यान आग लागली. या आगीवर सुमारे तीन तासानंतर अग्निशमन दलाने नियंत्रण मिळवले आहे. इमारतीच्या नवव्या मजल्यावरील कार्यालये नूतनीकरण केली जात होती. त्याजागी जुने लाकडी सामान असेच ठेवण्यात आले होते. शॉकसर्किटने आग लागल्यावर जुन्या लाकडी सामानाने पेट घेऊन आग भडकल्याचे समोर आले आहे. याच दरम्यान इमारतीचा दहावा मजला चर्चेचा विषय बनला आहे.
GST भवन राम भरोसे | जीव मुठीत घेऊन हजारो कर्मचारी करतायेत काम
जीएसटी भवनमध्ये दहावा मजला अनधिकृत -
जीएसटी भवनमध्ये दहावा मजला अनधिकृत असल्याची चर्चा सुरु झाली आहे. याबाबत पालिकेने काहीही बेकायदेशी बांधकाम नसल्याची माहिती दिली आहे. तर ही इमारत 55 वर्ष जुनी होती. या इमारतीचे एक ते दिड वर्षांपूर्वी स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले. ऑडिटसाठी व्हीजेटीआय संस्थेची नेमणूक करण्यात आली होती. इमारत नऊ मजल्याची असताना त्यात कर्मचाऱ्यांना जागा कमी पडत असल्याने दहावा मजला बांधण्यात आला. या मजल्यामुळे इमारतीवर भार वाढला असून तो निष्कासित करावा असा रिपोर्ट देण्यात आला आहे. त्याप्रमाणे इमारतीचा दहावा मजला काढून टाकण्याचे काम सुरु होते. हे काम सुरु असतानाच आग लागून इमारतीचे वरील तीन मजले जाळून खाक झाले आहेत.
Mumbai Fire | तीन तासांनंतर मुंबईतल्या जीएसटी भवनाला लागलेली आग आटोक्यात | ABP Majha