मुंबई : दिवसेंदिवस मुंबईसह राज्यात वाढत जाणारा कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव कमी करण्यात महाराष्ट्र सरकारला यश आल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई विद्यापीठातील अर्थशास्त्र विभागाचे प्राध्यापक नीरज हातेकर आणि त्यांची सहायक प्राध्यापिका पल्लवी बेल्हेकर यांनी एक अहवाल तयार केला आहे. या अहवालातून ही बाब समोर आली आहे. या अहवालासाठी दोन्ही संशोधकांनी राज्यातील आणि विविध जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा प्रशासनाकडून जाहीर होणारा आकडा ग्राह्य धरला आहे.


या अहवालातून शहरात साथीचे आजार वाढण्याची कारणे देखील नमूद करण्यात आली आहेत. यामध्ये मुंबईसारख्या शहरातील दाटवस्ती, तिथे नसलेल्या पायाभूत सुविधा या बाबी देखील कारणीभूत असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. अहवालात मुंबईसारख्या शहरात योग्य व सुनियोजित गृहनिर्माण धोरणाची आवश्यकता असल्याची बाब नमूद करण्यात आली आहे. याबाबत बोलताना प्राध्यापक नीरज हातेकर म्हणाले की, कोरोना बाधितांचा वेग मंदावला असला तरी वाढलेली चाचणीची संख्या, मोठी असलेली लोकसंख्या यामुळे रुग्णसंख्या वाढत असल्याचं दिसत आहे. शहरातील 42% लोकसंख्या ही शहराच्या 9.5% भागात झोपडपट्टीत राहत आहेत. अशा गर्दीच्या ठिकाणी फिझिकल डिस्टनसिंगचे नियम पाळणे अवघड असल्याने रुग्णसंख्येचा वेग अधिक असून विषाणूचा प्रसार झपाट्यांने होतं असल्याची माहिती प्राध्यापक हातेकर यांनी दिली आहे.


मुंबईत लॉकडाऊनमध्ये बनावट ई पास बनवणाऱ्याचं रॅकेट,एकाला अटक


राज्यात रुग्ण दुपटीचा कालावधी वाढला
राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. गेल्या आठवड्यापासून राज्यात रोज सलग दोन हजारच्या घरात नवीन रुग्णांची वाढ होताना दिसत आहे. तर, काल बुधवारी एका दिवसातील सर्वाधिक 105 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक म्हणजे राज्याचा रुग्ण दुपटीचा वेग मागील आठवड्यात 11.5 दिवस होता. तो काल 14.7 दिवस झाला आहे. तर, रुग्ण बरे होण्याची संख्याही नियमित वाढत आहे. काल 1168 रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 31.5 टक्के एवढे आहे.


राज्यात कोरोना संक्रमितांची संख्या 60 हजाराच्या घरात
राज्यात बुधवारी कोरोनाच्या तब्बल 2190 नवीन रुग्णांची नोंद झाली. परिणामी राज्यातील कोरोना बाधितांची संख्या 56,948 वर गेली आहे. या पैकी सध्या राज्यात 37,125 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. दरम्यान, राज्यात 105 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत 1897 जणांचा मृत्यू झाला आहे.


Maharashtra Police | गेल्या 24 तासात राज्यभरात 131 पोलिसांना कोरोनाची लागण