मुंबई: कुर्ला स्थानकाजवळ आज पहाटे चारच्या दरम्यान मालगाडी रुळावरुन घसरली. मालगाडी घसरल्यानं हार्बरच्या रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला असून गाड्या 15 ते 20 मिनिटं उशीरानं धावत आहेत.
दरम्यान, सकाळी सहाच्या सुमारास मालगाडी हटवण्यात यश रेल्वे प्रशासनाला यश आलं असली तरी हार्बर रेल्वेच्या वाहतुकीवर याचा परिणाम झाल्याचं दिसून येत आहे.
हार्बर रेल्वे उशीरानं धावत असल्यानं सकाळच्या वेळी कामासाठी बाहेर पडलेल्या प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.