हेडलाईन्स: आयुक्त तुकाराम मुंढेंविरोधात सर्वपक्षीय आंदोलन, फेरीवाले, झोपडपट्ट्यांवरील कारवाईला विरोध, शालेय साहित्यास विलंब झाल्याचा आरोप --------------------------------- मुंबई: घाटकोपरच्या वॉर्ड क्र. 123मधील शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार भारती बावधनेंची शिवसेनेचे बंडखोर उमेदवार सुधीर मोरेंविरोधात पोलिसात तक्रार --------------------------------- ठाणे: पादचारी पुलाच्या उभारण्याकरिता मानपाडा जंक्शन ते तत्त्वज्ञान सिग्नल या दरम्यानची सर्व प्रकारची वाहतूक १० फेब्रुवारी रात्री 10.00 वाजेपासून ते ११ फेब्रुवारी सकाळी 9.00 वाजेपर्यंत बंद राहणार --------------------------------- 1. पुन्हा युतीचा विचार नाही, मुंबई तोडण्यासाठी भाजपचा पालिकेवर डोळा, सामनाच्या मुलाखतीत उद्धव ठाकरेंचा निर्वाणीचा इशारा   --------------------------------- 2.  भविष्यात दाऊदही भाजपत दिसेल, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल, तर मनमोहन सिंहांवरच्या टीकेवरुन मोदींना खडे बोल --------------------------------- 3. 18 फेब्रुवारीच्या जाहीर सभेत शिवसेना मंत्री उद्धव ठाकरेंकडे राजीनामा देणार, सुत्रांची माहिती,  तर मुंबईत निवडणुकीनंतर युतीचे गिरीश महाजनांकडून संकेत --------------------------------- 4.  नवी मुंबईत रेल्वे स्थानकावर जिलेटीनच्या कांड्या आढळल्या, 3 दिवसांत तिसरी घटना, घातपाताची शक्यता --------------------------------- 5. महापालिका आणि जिल्हा परिषदेत निवडणुकीत चुकू नका, नाहीतर नोटाबंदीनंतर नसबंदी अटळ, धनंजय मुंडेंची भाजपवर टीका --------------------------------- 6. झुरळाचा नाकातून थेट डोक्यात शिरकाव, चेन्नईच्या महिलेवर यशस्वी शस्त्रक्रिया, झुरळाला जिवंत बाहेर काढलं --------------------------------- 7.  मुरली विजयपाठोपाठ कर्णधार विराट कोहलीचंही शतक साजरं; हैदराबाद कसोटीत टीम इंडियाची तीन बाद 356 धावांची मजल