मुंबई : कोविड सेंटर (Covid Scam)  घोटाळ्याप्रकरणी ईडीनं (ED) दाखल केलेल्या आरोपपत्रात धक्कादायक आरोप करण्यात आले आहेत. बीएमसी अधिकारी आणि राजकीय नेत्यांना लाच म्हणून सोन्याचे बार, बिस्किटे आणि नाणी वाटण्यात आली, असा दावा ईडीनं केला आहे. लाइफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट सेवेच्या भागीदारांपैकी संजय शहा यानं सोन्याच्या बार, बिस्किटं आणि नाणी खरेदी केले, आणि ते सुजित पाटकर या भागीदाराला दिले. मग पाटकर यांनी ते बीएमसी अधिकारी आणि इतरांना वाटले असा दावा आरोपपत्रात करण्यात आला आहे. सुजित पाटकर यांनी बीएमसी अधिकार्‍यांना रोख रक्कम आणि मौल्यवान वस्तू देखील दिल्याचा आरोप ईडीनं केला आहे. 


कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रात हे स्प्ष्ट केले आहे की,  सोन्याचे बार, बिस्किटे, नाणी हे बीएमसी अधिकार्‍यांमध्ये आणि राजकारणी लोकांना वाटली गेली होती. बीएमसी अधिकारी आणि राजकीय नेत्यांना लाच म्हणून वितरित करण्यात आलेल्या सोन्याच्या बार, बिस्किटे आणि नाणी सुमारे 60 लाख रुपयांची होती.लाइफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट सेवेच्या भागीदारांपैकी एक संजय शहा याने सोन्याच्या बार, बिस्किटे आणि नाणी खरेदी केले. खरेदी केलेल्या वस्तू सुजित पाटकर या भागीदाराला दिले आणि पाटकर यांनी मग ते  बीएमसी अधिकारी आणि इतरांना वाटून दिले  असा दावा  केला आहे.  सुजित पाटकर यांनी बीएमसी अधिकार्‍यांना रोख रक्कम आणि मौल्यवान वस्तूही सुद्धा दिल्याचा दावा आरोपपत्रात करण्यात आला आहे.


सुजित पाटकरांना अटक 


 शुक्रवारी न्यायालयाने लाइफलाइन रुग्णालय व्यवस्थापन सर्व्हिसेसविरुद्ध ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्राची दखल घेतली. ज्या फर्मला 2020 मध्ये दहिसर आणि वरळी कोविड केंद्रांना वैद्यकीय सेवा पुरवण्याचे कंत्राट देण्यात आले होते. सुजित पाटकर हे संजय राऊत, हेमंत गुप्ता, संजीव शहा आणि राजीव साळुंखे यांचे निकटवर्तीय होते.  ईडीने या वर्षाच्या सुरुवातीला या प्रकरणात दहिसर केंद्राचे डीन सुजित पाटकर आणि डॉ किशोर बिसुरे यांना अटक केली होती. 


लाइफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेसला 21.07 कोटी


लाइफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेसला 21.07 कोटी रुपयांचा बेकायदेशीर नफा झाल्याचे आरोपपत्रात ईडीने स्पष्ट केले आहे. गुन्ह्यातील रक्कम लाइफलाइनच्या बँक खात्यांमधून आरोपी भागीदार आणि इतर आरोपींच्या बँक खात्यांमध्ये वळवण्यात आली आणि त्यांनी त्यांच्या वैयक्तिक खर्चासाठी वापरली असे आरोपत्रात स्प्ष्ट केले आहे. लाइफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंटने जुलै 2020 ते फेब्रुवारी 2022 या कालावधीसाठी दहिसर आणि वरळी येथे जम्बो कोविड सुविधांसाठी डॉक्टर, परिचारिका, बहुउद्देशीय कामगार (वॉर्डबॉय, आया आणि डॉक्टर असिस्टंट) आणि तंत्रज्ञ यांच्या पुरवठ्यासाठी निविदा प्राप्त केल्या. दरम्यान, लाइफलाइन हॉस्पिटल व्यवस्थापन सेवांच्या भागीदारांनी EOI अटी पाळल्या नाहीत आणि कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली. तसेच दहिसर जंबो कोविड केंद्राची बनावट हजेरी पत्रके आणि कर्मचार्‍यांच्या नोंदीद्वारे  पुरेशी कर्मचारी उपस्थिती दाखवून पावत्या सादर केल्या गेल्या.लाइफलाइनचे भागीदार बीएमसी कर्मचाऱ्यांच्या संगनमताने पावत्या काढण्यात यशस्वी झाले. 


हे ही वाचा :


संजय राऊतांचे निकटवर्तीय सुजीत पाटकरांना अटक; BMC कोविड घोटाळा प्रकरणी ईडीची कारवाई