जमिनीचा योग्य मोबदला आणि धर्मा पाटील यांना शहीद भूमीपुत्र शेतकऱ्याचा दर्जा सरकार लेखी आश्वासनात देणार नाही, तोपर्यंत मृतदेह स्वीकारणार नाही, अशी भूमिका त्यांचा मुलगा नरेंद्र पाटील यांनी घेतली आहे.
धर्मा पाटील यांचं नेत्रदान
मृत्यूनंतर धर्मा पाटील यांच्या कुटुंबीयांनी नेत्रदानाचा निर्णय घेतला आहे. धर्मा पाटील यांच्यावर उपचार सुरु असतानाच त्यांचा मुलगा नरेंद्र पाटील यांनी अवयवदानाचा फॉर्म भरुन दिला होता.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
धर्मा पाटील हे धुळे जिल्ह्यात रहिवाशी. धुळे जिल्ह्यात होणाऱ्या औष्णिक वीज प्रकल्पात त्यांची पाच एकर जमीन संपादित करण्यात आली होती. मात्र पाच एकराच्या बदल्यात त्यांना केवळ चार लाख रुपये भरपाई देण्यात आली.
भाजप सरकार हे कडेलोट करण्याच्या लायकीचं: राजू शेट्टी
धर्मा पाटील यांच्या चार एकर जमिनीत आंब्याची 600 झाडं होती. विहीर, ठिबक सिंचन आणि वीज अशी बागायती शेती असलेल्या धर्मा पाटील यांना केवळ 4 लाखांचा मोबदला देण्यात आला.
इतर शेतकऱ्यांच्या तुलनेत भरपाई कमी मिळाल्याबाबत धर्मा पाटील यांनी गेल्या तीन महिन्यांपासून पाठपुरावा सुरू केला. मात्र त्यांना अधिकारी आणि संबंधित मंत्रालयाकडून योग्य उत्तरं मिळत नसल्याने त्यांनी विषप्राशन केलं.
धर्मा पाटलांच्या विषप्राशनानंतर जाग आलेल्या सरकारनं पाटील यांच्या कुटुंबियांना 15 लाखाचं सामुग्रह अनुदान देऊ केलं. मात्र अनुदान नको, आम्हाला मोबदला द्या, अशी मागणी लावून पाटील कुटुंबाने धरली आहे.
संबंधित बातम्या :